
लातूर, 30 मार्च (हिं.स.)।
: औसा तालुक्यातील फत्तेपूर परिसरात किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एका व्यक्तीस मारहाण करण्यात आली. फिर्यादी विलास माळी (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेजारील काही व्यक्तींनी जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांना शिवीगाळ करत लाठी-काठ्यांनी मारहाण केली.
या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्या मोटरसायकलचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. तसेच, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis