विश्वात्मक श्रीराम विषयावर व्याख्यानमाला संपन्न
डोंबिवली, 30 मार्च (हिं.स.) : पूर्वेकडील स्वामींच्या घराच्या अंतर्गत चैतन्यप्रभा मंडळ आयोजित ‘समर्थ व्याख्यानमाला’ नुकतीच उत्साहात पार पडली. या व्याख्यानमालेत व्याख्यात्या डॉ. धनश्री साने यांनी “विश्वात्मक श्रीराम” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
Vaidya


डोंबिवली, 30 मार्च (हिं.स.) : पूर्वेकडील स्वामींच्या घराच्या अंतर्गत चैतन्यप्रभा मंडळ आयोजित ‘समर्थ व्याख्यानमाला’ नुकतीच उत्साहात पार पडली. या व्याख्यानमालेत व्याख्यात्या डॉ. धनश्री साने यांनी “विश्वात्मक श्रीराम” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला स्वामींच्या घराच्या विश्वस्त माधवी सरखोत, लेखिका मीना गोडखिंडी, प्रा. सुगंधा केसकर, स्मिता तळेकर आणि मेघना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माधवी सरखोत यांनी स्वामींच्या घरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

आपल्या व्याख्यानात डॉ. साने यांनी सांगितले की, अभिजात वाङ्मय परंपरा आणि लोकपरंपरेत रामकथा शतकानुशतके विविध स्वरूपात सांगितली, गायली आणि लिहिली जात आहे. महर्षी वाल्मिकी यांनी उभे केलेले श्रीरामांचे चारित्र्य भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ ठरले आहे. रामकथेचा प्रसार नेपाळ, ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा, मलेशिया, कंबोडिया आणि थायलंडपर्यंत झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच चिनी आणि जपानी रामायणाचाही उल्लेख त्यांनी केला.

वाल्मिकी रामायणाच्या आधारे शिवरामायण, हनुमंत रामायण, आनंद रामायण, अध्यात्म रामायण, अद्भूत रामायण, भावार्थ रामायण यांसारख्या अनेक रामकथांची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. विविध स्वरूपे असली तरी श्रीरामांवरील श्रद्धा सर्वत्र समान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना गोडखिंडी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुगंधा केसकर यांनी केले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande