रेणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग .. शेतकऱ्यांना दिलासा
लातूर, 30 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पातून १६.२६ घनमीटर पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली. रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, रेण
रेणा प्रकल्प


लातूर, 30 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पातून १६.२६ घनमीटर पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.

रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, रेणापुर व खरोळा बंधारा शेजारील शेतक-यांनी सिंचनासाठी रेणापूर मध्यम प्रकल्पातून बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेवून प्रकल्पाच्या गेट क्र १ व गेट क्र ६ मधून पाणी सोडण्याची सुरूवात करण्यात आली. सध्या प्रकल्पात ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आज सोडण्यात आलेल्या पाण्याने घनसरगाव, रेणापुर, जवळगा व खरोळा हे चार बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत. चार बंधारे भरण्यासाठी ८ टक्के पाणीसाठा सोडावा लागणार आहे. त्यानंतर प्रकल्पात ५९% टक्के पाणी साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande