
नंदुरबार, 30 मार्च (हिं.स.) : नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी व अडचणी तत्परतेने निवारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता रंगावली सभागृहात जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.
शासकीय यंत्रणेअंतर्गत, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीरीत्या सोडवण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि मंत्रालय स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यातील जनतेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो.
तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया :-
तालुकास्तर :- नागरिकांनी वैयक्तिक तक्रारी किंवा निवेदने प्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात सादर करणे आवश्यक आहे. हा दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला जातो.
जिल्हास्तर :- जर तालुकास्तरीय निर्णयावर समाधान न मिळाले, तर नागरिकांनी आपली तक्रार किंवा निवेदन जिल्हास्तरीय लोकशाही दिनात सादर करावे.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर