
छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च (हिं.स.)। गच्छाधिपती अभयदेवसुरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेने नवकार फाउंडेशन आणि जितो छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने आयोजित नवकार महामंत्र जपानुष्ठान पार पडले. या कालावधीत २१० कोटींहून अधिक नवकार मंत्राचा जप पूर्ण झाला असून, आतापर्यंत पाच लाख कुटुंबे आणि २५ हजार साधू-साध्वींनी या जपानुष्ठानात सहभाग नोंदवला. ९ एप्रिलला नवकार जपाची सांगता होणार आहे.
मंगळवारी (ता. ३१) महावीर जयंतीचे निमित्त साधून प्रत्येक जैन बांधवाने आपल्या कुटुंबासह घरी किमान ११ माळा नवकार महामंत्राचा जप करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ जैन समाजच नव्हे तर जागतिक शांततेची इच्छा बाळगणाऱ्या अजैन व्यक्ती आणि विविध सामाजिक संस्थांनीही या शांतता कार्यात सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी
नऊ एप्रिल रोजी 'विश्व नवकार दिवस' निमित्त विशेष जपअनुष्ठानाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सामूहिक जप करण्यात येणार आहे.
जितो इंटरनॅशनलचे पृथ्वीराज कोठारी, अभयवाणी परिवारतर्फे मोक्षरत्न सुरेश्वर, सिद्धीसुधा, रवी मुगदिया, अनिलकुमार संचेती, विलास साहूजी, संजय संचेती यांच्यासह विनोद बोकडिया, राजेश मुथा, अजित जैन, रवी लोढा, निलेश जैन, पंकज साकला, हितेश कांकरिया, प्रकाश कोचेटा, अभिजित हिरप, पीयूष कासलीवाल, विकास रायमाणे, अमित काला, संतोष पापडीवाल आणि समीर ठोळे पुढाकार घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis