बीड येथे हज यात्रेकरूंसाठी मंगळवारी प्रशिक्षण शिबिर
बीड, 30 मार्च (हिं.स.)। हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मरकज-ए-खिदमत-ए-हुज्जाज जिल्हा हज कमिटी बीड यांच्या वतीने, ३१ मार्च रोजी तिसऱ्या हज प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणात मौलाना शेख अहमद काशफी साहेब, मौलाना अब्दुल खय्यूम
बीड येथे हज यात्रेकरूंसाठी मंगळवारी प्रशिक्षण शिबिर


बीड, 30 मार्च (हिं.स.)। हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मरकज-ए-खिदमत-ए-हुज्जाज जिल्हा हज कमिटी बीड यांच्या वतीने, ३१ मार्च रोजी तिसऱ्या हज प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या प्रशिक्षणात मौलाना शेख अहमद काशफी साहेब, मौलाना अब्दुल खय्यूम कासमी साहेब, मौलाना मुफ्ती आरीफ साहेब तसेच मौलाना शकील अहमद कासमी साहेब मार्गदर्शन करणार आहेत. गत २५ वर्षांपासून निस्वार्थ सेवा देणाऱ्या हज कमिटीमार्फत हे प्रशिक्षण आयोजित केले जाते. मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बार्शी रोडवरील अमन फंक्शन हॉल येथे हे शिबिर होणार आहे. या प्रशिक्षणात हज यात्रेशी संबंधित विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

हज यात्रेकरूंना आवश्यक लसीकरण करून त्याच दिवशी आवश्यक प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. सर्व हज यात्रेकरूंनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोहम्मद जमील, मोहम्मद शाफे, शेख इरफान तसेच शेख अखिल यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande