लातूर, 30 मार्च (हिं.स.) सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गतवर्षीपासून ई- ई-सुश्रुत संकणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. याअंतर्गत रुग्णांची नोंदणीसह विविध बाबींची माहिती ही ऑनलाईन पद्धतीने जतन करून ठेवली जात आहे. दरम्यान, ई-सुश्रूत प्रणालीमध्ये रूग्णांची नोंदणी, डॉक्टरांकडील नोंद, विविध तपासण्यांचे अहवाल, उपलब्ध वैद्यकीय साहित्याची माहिती यासह विविध १२ मॉड्युलचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या १४ आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रूत प्रणालीतील सर्व १२ मॉड्युल कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांत प्रथम जळकोट तालुक्यातील आरोग्य संस्थांममध्ये १२ मॉड्युल लवकरच सुरू होणार आहेत.
या प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये विविध आजारांच्या रूग्णांच्या उपचारासाठी औषधींबरोबरच उपचारांची माहिती ठेवणे आवश्यक असते. पार्श्वभूमिवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ई-सुश्रूत संकणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. लातूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ११ ग्रामीण रूग्णालये, निलंगा उपजिल्हा रूग्णालय, उदगीर सामान्य रूग्णालय आणि लातूर शहरातील स्त्री रूग्णालये आहेत. दरम्यान, एप्रिल २०२५ पासून आधुनिक पद्धतीने रुग्णांची, त्यांच्यावर केलेल्या उपचारांची औषधोपचाराची
माहिती ही ई-सुश्रुत संगणिकय प्रणा-लीद्वारे करण्यात येत आहे. ई-सुश्रुत प्रणालीतील नोंद झाल्यानंतर रूग्णांना कागदपत्रे गहाळ होणे, हरविले तरही सर्व रिपोर्ट हे ऑनलाइन असल्यामुळे कधीही एका क्लिकवर सर्व माहिती मिळणार आहे. याशिवाय हे आभा कार्डलाही हे लिंक करता येणार असल्यामुळे रूग्णांसाठी हे महत्वाचे ठरत आहे. याशिवाय रूग्णालयातील विविध कामे ही पारदर्शक होणार असल्यामुळे रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा, उपचार मिळणे सोयीचे होणार आहे. दरम्यान, रूग्णांशी संबंधित माहितबरोबरच आरोग्य संस्थाअंतर्गत बाबींचीही नोंद या प्रणालित असणार आहे.
ई-सुश्रूत प्रणालीतील १२ मॉड्युल
१) रजिस्ट्रेशन (नोंदणी)
२) डॉक्टर करणारे रूग्णांची नोंद
३) आपात्कालिन रूग्ण किंवा ओपीडी व्यतरिक्त रूग्णांची नोंद
४) औषधी
५) इन्वेस्टिगेशन (लॅब तपासणी रिपोर्ट)
६) इन्टरव्हेशन (वैद्यकीय साहित्या/सामुग्रीची माहिती)
७) डायट किचन
८) लाँड्री
९) बीएमडब्लु
१०) न्यु आभा जनरेट
११) आभा टोकन
१२) हेल्थ रेकॉर्ड
यामध्ये सर्वांत प्रथम जळकोट तालुक्यातील आरोग्य संस्थांमध्ये या प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये विविध आजारांच्या रूग्णांच्या उपचारासाठी औषधींबरोबरच उपचारांची माहिती ठेवणे आवश्यक असते. पार्श्वभूमिवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ई-सुश्रूत संकणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. लातूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ११ ग्रामीण रूग्णालये, निलंगा उपजिल्हा रूग्णालय, उदगीर सामान्य रूग्णालय आणि लातूर शहरातील स्त्री रूग्णालये आहेत. दरम्यान, एप्रिल २०२५ पासून आधुनिक पद्धतीने रुग्णांची, त्यांच्यावर केलेल्या उपचारांची औषधोपचाराची
माहिती ही ई-सुश्रुत संगणिकय प्रणा-लीद्वारे करण्यात येत आहे. ई-सुश्रुत प्रणालीतील नोंद झाल्यानंतर रूग्णांना कागदपत्रे गहाळ होणे, हरविले तरही सर्व रिपोर्ट हे ऑनलाइन असल्यामुळे कधीही एका क्लिकवर सर्व माहिती मिळणार आहे. याशिवाय हे आभा कार्डलाही हे लिंक करता येणार असल्यामुळे रूग्णांसाठी हे महत्वाचे ठरत आहे. याशिवाय रूग्णालयातील विविध कामे ही पारदर्शक होणार असल्यामुळे रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा, उपचार मिळणे सोयीचे होणार आहे. दरम्यान, रूग्णांशी संबंधित माहितबरोबरच आरोग्य संस्थाअंतर्गत बाबींचीही नोंद या प्रणालित असणार आहे.
ई-सुश्रूत प्रणालीतील १२ मॉड्युल
१) रजिस्ट्रेशन (नोंदणी)
२) डॉक्टर करणारे रूग्णांची नोंद
३) आपात्कालिन रूग्ण किंवा ओपीडी व्यतरिक्त रूग्णांची नोंद
४) औषधी
५) इन्वेस्टिगेशन (लॅब तपासणी रिपोर्ट)
६) इन्टरव्हेशन (वैद्यकीय साहित्या/सामुग्रीची माहिती)
७) डायट किचन
८) लाँड्री
९) बीएमडब्लु
१०) न्यु आभा जनरेट
११) आभा टोकन
१२) हेल्थ रेकॉर्ड
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis