ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख 'लखपती दिदी' झाल्या - फडणवीस
मुंबई, 06 मार्च (हिं.स.) - महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख ''लखपती दिदी'' झाल्या आहेत. आता २०२६-२७ मध्ये आणखी २५ लाख बहिणींना ''लखपती दिदी'' करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन
ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख 'लखपती दिदी' झाल्या - फडणवीस


मुंबई, 06 मार्च (हिं.स.) - महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख 'लखपती दिदी' झाल्या आहेत. आता २०२६-२७ मध्ये आणखी २५ लाख बहिणींना 'लखपती दिदी' करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. याशिवाय, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनाही पुढे चालू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

याशिवाय महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू आणि त्यांच्या विक्री संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या, महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू आणि विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यांत १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच सध्या राज्यांतील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर, त्याचे योग्य विश्लेषण करून, एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल, असेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande