'पीएमजी' पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
ठाणे, 07 मार्च (हिं.स.)।केंद्र सरकारच्या ''पीएमजी'' (PMG) पोर्टलवर नोंदवण्यात आलेल्या प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गती द्यावी आणि भूसंपादन विषयक कार्यवाही मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्री
'पीएमजी' पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा


ठाणे, 07 मार्च (हिं.स.)।केंद्र सरकारच्या 'पीएमजी' (PMG) पोर्टलवर नोंदवण्यात आलेल्या प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गती द्यावी आणि भूसंपादन विषयक कार्यवाही मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.

नगरविकास विभागाचे सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे (Video Conferencing) आयोजित आढावा बैठकीत ते सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, विश्वास गुजर, विजयानंद शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील भाईंदर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि शहापूर येथील भूसंपादन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. प्रलंबित तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून विहित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande