
रत्नागिरी, 6 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ करण्याकरिता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जलदूत डॉ. प्रशांत परांजपे यांनी कृती आराखडा सादर केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याची भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. प्रचंड पाणीटंचाईचा सामना जिल्ह्याला करावा लागणार आहे गै तीन वर्षे सातत्याने जलजीवन मिशनच्या माध्यमातून श्री. परांजपे यांनी भूजल साठा वाढ करण्याकरिता विविध ग्रामपंचायतींना मार्गदर्शन केले आहे. त्याच समवेतच भूजल पातळी वाढ करण्याकरिता कृती आराखडादेखील वारंवार सादर केला आहे. यावर्षीही आराखडा सादर केला आहे. जिल्हा परिषदेने विशेष निऊ उपलब्ध करावा आणि त्या समावेतच कृती आराखडा करून प्रत्येक गावातील नागरिकाचे प्रबोधन करून कृती आराखडा यशस्वी करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या कृती आराखड्यानुसार १५ मार्चपर्यंत गाव/ वाडी येथील ग्राप दवाखाने ,शाळा, अंगणवाडी, वाचनालये, मंदिरे, आरोग्य विभाग , व्यायामशाळा अर्थात गावातील/ वाडीतील सर्व सार्वजनिक इमारतींच्या छपरावर पडणार्या पावसाचा थेंब जमिनीत जिरवण्याचे नियू पूर्ण करणे, १६ मार्च ते 30. मार्च गावातील / वाडीतील बहुमजली इमारतींचे छतावरील पाणी साठवणूकविषयक काम पूर्ण, 1 एप्रिल ते 20 एप्रिल - गावातील प्रत्येक घराच्या छतावरील पडणारा पाण्याचा थेंब वाचवण्याचे काम पूर्ण करणे, 20 एप्रिल ते 10 मे - गावातील नदी / नाले, सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा आणि स्वच्छ करणे आणि सार्वजनिक विहीर पुनर्भरण आखणी पूर्ण करणे तर 11 मे ते 15 मे - झालेल्या सर्व तीनही टप्यातील कामाचे पुनर्सर्वेक्षण करणे व त्रुटी भरून काढणे.
या सर्व कामाकरिता स्वच्छाग्रही, जलसेवक, जलकर्मी, जलसुरक्षा रक्षक , पाणी व स्वच्छता समिती ग्राम , सरपंच व सर्व सदस्य, ग्रामपंचायत प्रशासन - युवक मंडळे, प्रभावी व्यक्ती यांना विश्वासात घेऊन व समवेत घेऊन काम करावं लागेल.असा लिखित आराखडा डॉ. प्रशांत परांजपे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदही रानडे यांना सादर केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी