पंकज कोठारी नारेडको महाराष्ट्राचे संयुक्त सचिव
अकोला, 06 मार्च (हिं.स.) : अकोल्यातील उद्योजक, चार्टर्ड सिव्हिल इंजिनिअर व अनुभवी बिल्डर-डेव्हलपर पंकज रमेशचंद्र कोठारी यांची नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीवर संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आ
Photo


अकोला, 06 मार्च (हिं.स.) : अकोल्यातील उद्योजक, चार्टर्ड सिव्हिल इंजिनिअर व अनुभवी बिल्डर-डेव्हलपर पंकज रमेशचंद्र कोठारी यांची नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीवर संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयपूर येथे आयोजित कार्यक्रमात नारेडको अध्यक्ष प्रशांत शर्मा, माजी अध्यक्ष राजन बांदेलकर, तसेच चेअरमन एमेरिटस डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

नारेडको ही संस्था भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासासाठी काम करते. देशभरातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील विकासक, गुंतवणूकदार व व्यावसायिकांना एकत्र आणून नारेडको शाश्वत विकासासाठी कार्यरत आहे.

३८ वर्षांच्या समृद्ध अनुभवासह पंकज कोठारी अकोला तसेच विदर्भातील रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा व गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्य व केंद्र शासनासमोर विदर्भातील रिअल इस्टेट प्रश्न प्रभावीपणे मांडता येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande