

अकोला, 06 मार्च (हिं.स.)।अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मध्य भागातून वाहणा-या मोर्णा नदीत जलकुंभी वाढण्यासा मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली असल्याने शहरात डासांच्या प्रादुर्भावात सुध्दा झपाट्याने वाढ होत असून तसेच शहरातील नागरिकांची जलकुंभी काढण्याबाबतची मागणी लक्षात घेता महापौर सौ.शारदा रणजीत खेडकर आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या निर्देशानुसार मोर्णा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम आज, 6 मार्च रोजी पासून सुरू करण्यात आले असून महापौर शारदा रणजीत खेडकर, महानगर अध्यक्ष तथा नगरसेवक जयंत मसने, उपमहापौर अमोल गोगे, शहर सुधार आघाडीचे गटनेता पवन महल्ले, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ.आरतीताई घोगलिया, माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ.वैशालीताई शेळके, नगरसेविका सौ. उषाताई वीर्क, मंजुषाताई शेळके, ॲड. कल्पना गोटफोडे, नगरसेवक नितिन ताकवाले यांच्या हस्ते हार व नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर, संजय गोटफोडे, दीप मनवानी, सतीष मिरजामले व ईतर शहर सुधार आघाडीचे पदाधिकारी, मोटर वाहन विभाग प्रमुख अनिल बिडवे, शाम गाढे आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे