बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे 3 कोटी 62 लाखांचे विद्यावेतन लाटले
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडे बांधकाम कामगारांची मुले अन्य राज्यांत उच्च शिक्षण घेत असल्याचे दाखवत विविध बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे सोलापुरातील सहाय्यक आयु
बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे 3 कोटी 62 लाखांचे विद्यावेतन लाटले


सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडे बांधकाम कामगारांची मुले अन्य राज्यांत उच्च शिक्षण घेत असल्याचे दाखवत विविध बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे सोलापुरातील सहाय्यक आयुक्त कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी व एजंटांनी मिळून तीन कोटी 62 लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले. अपहारप्रकरणी 20 जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघाना निलंबित केले आहे.नियमित कर्मचारी संतोषसिंग राजपूत, उज्ज्वल सूर्यवंशी, अजिंक्य पवार तसेच आकाश कोळी, समिर पटेल, अन्नपुर्णा पंडकी, तब्बसुम यादगिरी, अर्जुन संगा, रविराज मुसळे, अंबादास बुगडे, भारत करंडे, सूरज मगर, रविकांत पाटील, शिवानंद सुरवसे, आशितोष कटारे, अर्चना पाटील, शीतल परदेशी, सौरभ हलके, बाळासाहेब शिंदे, चंदन दिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील संतोषसिंग राजपूत, उज्ज्वल सूर्यवंशी व अजिंक्य पवार या तिघांना निलंबित केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande