भंडारा : पोहरा गावात आरा मशिन आगीच्या भक्ष्यस्थानी
भंडारा 06 मार्च (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा येथील दिगंबर कोंडू अंबादे यांच्या आरा मशीन मध्ये अचानक आग लागली आग एवढी तीव्र होती की त्यामध्ये कटाई साठी आलेले मौल्यवान लाकूड ,मशीन,ट्रॉली अशा प्रकारची यंत्रे हे जळून खाक झाली.
भंडारा : पोहरा गावात आरा मशिन आगीच्या भक्ष्यस्थानी


भंडारा 06 मार्च (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा येथील दिगंबर कोंडू अंबादे यांच्या आरा मशीन मध्ये अचानक आग लागली आग एवढी तीव्र होती की त्यामध्ये कटाई साठी आलेले मौल्यवान लाकूड ,मशीन,ट्रॉली अशा प्रकारची यंत्रे हे जळून खाक झाली. प्रसंगावधानामुळे जीवित हानी टळली असून, लागून असलेल्या घरांनाही या आगीचा धोका निर्माण झाला होता स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या प्रमाणात लाकूड साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण करण्यात आले मात्र यामध्ये अंदाजे एकोणीस लाखाचे नुकसान झालेले आहे.ही आग इलेक्ट्रिक च्या शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande