
येवला, 06 मार्च (हिं.स.) , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने येवला शिवसृष्टी व येवला संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगरसेवक दीपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, नगरसेवक महेश काबरा,गणेश गायकवाड, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, भाऊसाहेब धनवटे, नवनाथ थोरात, दीपक गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV