पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल
छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च (हिं.स.)। पैठण येथे दि.९ ते ११ या कालावधीत संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव आहे. राज्यभरातून अंदाजे १२ ते १५ लाख भाविक विविध वाहनाने वा पायी यात्रा उत्सवाकरीता येत असतात. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नय
पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल


छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च (हिं.स.)।

पैठण येथे दि.९ ते ११ या कालावधीत संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव आहे. राज्यभरातून अंदाजे १२ ते १५ लाख भाविक विविध वाहनाने वा पायी यात्रा उत्सवाकरीता येत असतात. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पैठणकडे जाणाऱ्या व पैठण कडून येणाऱ्या जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-

१. शहागड- आपेगाव- पैठणकडून -छत्रपती संभाजीनगरमार्गे जाणारी वाहने शहागड -पाचोड -मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येतील.

२. सोलापूर धुळे एनएच - ५२ महामार्ग कचनेर फाटा, पोरगाव चौफुली, बिडकीन -शेकटा -इसारवाडी फाटा- छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगर कडे जाणारी वाहने सोलापूर धुळे एनएच -५२ महामार्ग बीड मार्गे येणारी जड वाहतूक ही एनएच -५२ महामार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे जातील. याचप्रमाणे उलट दिशेने वाहने ये -जा करतील.

३. जालना कडून करमाड -कचनेर फाटा-पोरगाव - बिडकीनचे- शेकटा इसारवाडी फाटा -छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगर कडे जाणारी वाहने ही करमाड -कचनेर फाटा -सोलापूर धुळे एनएच-५२ महामार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे ने अहिल्यानगरकडे जाईल.या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.

४. छत्रपती संभाजीनगर- बिडकीन -पैठण मार्गे शेवगांव कडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर -वाळूज-गंगापुर-वाळुज मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

५. शेवगाव-पैठण-बिडकिन मार्गे छ.संभाजीनगराकडे येणारी वाहने शेवगाव –नेवासा-गंगापुर-वाळुज मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जातील.

६.इसारवाडी फाटा -शेकटा-बिडकिन-पैठण कडे येणारी जड वाहने इसारवाडी फाटा ए.एस.क्लब छत्रपती संभाजीनगर बीड बायपास मार्गे पाचोड कडे जातील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande