
अकोला, 06 मार्च (हिं.स.)।
अकोला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(महिला)यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी (१० मार्च) होणार आहे.
या मेळाव्यातून 154 पदे भरली जातील. डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मंगळवारी सकाळी 11 ते दु. 2 दरम्यान मेळावा होणार असून, इच्छूकांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे