सोलापूर : पहाटे उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। मोडनिंब (ता. माढा) ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आज पहाटे उभारण्यातआला. अचानक पहाटेच्या सुमारास हा पुतळा उभारल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. पहाटे चारच्या फटाक्यांच्या आतषबाजीने
hgf


सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। मोडनिंब (ता. माढा) ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आज पहाटे उभारण्यातआला. अचानक पहाटेच्या सुमारास हा पुतळा उभारल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. पहाटे चारच्या फटाक्यांच्या आतषबाजीने मोडनिंबकरांना जाग आली. यानंतर पुतळा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट देऊन आवश्यक परवानगी घेतल्या, की नाही याबाबत प्रशासनाकडे चौकशी करणार असल्याचे सांगितले. मोहोळ येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असाच अचानकपणे बसविण्यात आला. याशिवाय, पडसाळी (ता. माढा) येथेही काही दिवसांपूर्वी मागील दोन वर्षांपासून परवानगी नसल्याच्या कारणाने झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कापड काढून घेण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande