
नांदेड, 06 मार्च (हिं.स.)। खेळण्यात गुंग असलेल्या एक वर्षाचा चिमुकल्या शिवांशच्या घरातील आतील दरवाजा स्मार्ट लॉकमुळे अचानक बंद झाला. त्यामुळे शिवांशला काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठ केली मात्र, त्यांना कुणालाही यश आले नाही. शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि शिवांशची अवघ्या काही मिनिटांत सुटका केली. सव्वा तासांपासून कुटुंबासह अनेकांचा जिव टांगलेला होता. शिवांशच्या सुटकेमुळे अनेकांचा जिव भांड्यात पडला. ही घटना नांदेड शहरातील हनुमानगढ परिसरातील केशवनगर भागात घडली.
शहरातील हनुमानगढ परिसरातील केशव नगर येथील एका वृंदावन नावाच्या तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सतीश कंकरे यांचे घर आहे. सतीश कंकरे बाहेर कामानिमित्त गेले होते. त्यांची पत्नी व एक वर्षांचा मुलगा शिवांश
घरात होते. झशिवांश घरातील आतल्या खोलीत खेळणी खेळत होता. मुलगा खेळत आहे म्हणून आई कामात मन झाली. मात्र, याचवेळी स्मार्ट लॉक असलेला डोअर लॉक झाला. हे कुणाच्याही लक्षात आले नाही. शिवांश आई दिसत नसल्याने तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दरवाजा लॉक झाल्याचे त्या चिमुकल्याच्या लक्षात आले नाही. मात्र आईने दरवाजा लॉक झाल्याने तो लॉक काढण्याचा प्रयत्न केला आजूबाजूच्या लोकांना बोलावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवत इमारतीच्या पाठीमागच्या बाजूने खिडकीच्या ठिकाणी ३५ फिट अॅल्युमिनियम एक्सटेन्शन लेडर लावून खिडकीच्या आतमध्ये फायर हुकद्वारे बंद झालेल्या दरवाजाचे कडी काढून चिमुकल्या शिवांशची अग्निशमन टीमने सुटका केली
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis