
पुणे, 06 मार्च, (हिं.स.)। दर पत्रकात समाविष्ट न केलेल्या लोकसंख्येच्या दाखल्यासाठी फुरसुंगी नगर परिषदेकडून एक हजार शुल्क आकारण्यात येत आहे. हे शुल्क अधिक असल्याने यावर पुनर्विचार करून नागरिकांना परवडतील असे शुल्क निश्चित करावेत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
नव्याने स्थापन झालेल्या फुरसुंगी नगर परिषदेमध्ये नागरिकांना आवश्यक असणारे दाखले देण्यास सुरवात करण्यात आले आहेत. मात्र दाखल्यांच्या शुल्कांबाबत सविस्तर माहिती कार्यालयाच्या बाहेर फलकावर लावणे गरजेचे असताना ते लावले गेले नाहीत.
त्यामुळे शुल्कांबाबत नागरिकांना आवश्यक माहिती मिळत नाही. नगर परिषदेकडून दाखल्यांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. मात्र लोकसंख्येच्या दाखल्याचे शुल्क निश्चित करण्यात आले नसताना नगर परिषदेकडून या दाखल्यासाठी नागरिकांकडून एक हजार शुल्क आकारण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु