
छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च, (हिं.स.)। स्वातंत्र्यानंतर लोकशाही यशस्वी होईल का ही इंग्रजांची शंका भारतीयांनी खोटी ठरविली. गेल्या ७५ वर्षात भारतीय परंपरेतून मिळालेले आत्मज्ञान व सामुदायिक शहाणपणातून सांसदीय लोकशाही यशस्वी ठरली, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकप्रशासन विभाग आता ’डिपार्टमेंट ऑफ पब्लिक अॅडमिनस्ट्रेशन अॅण्ड पब्लिक पॉलिसी’ म्हणून ओळखला जाणार आहे. राज्यस्थानाचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात हा नामविस्तार करण्यात आले. विभागाचे राष्ट्रीय चर्चासत्र नाटयगृहात आयोजित करण्यात आले. प्रकुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, डॉ.पारसमल बोरा, विभागप्रमुख डॉ.श्याम शिरसाठ, संयोजक डॉ.ज्योती धायगुडे, डॉ.सतीश दांडगे यांचीही प्रमुख उपस्थिती होते. प्रारंभी डॉ.सतीश दांडगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच यावेळी ’भारतातील निवडणूक प्रक्रिया आणि पध्दती- लेखक डॉ.श्याम शिरसाठ, डॉ.विनोद आवारे व ’स्मार्ट माईंड, सेफ मांईड लेखक - डॉ.स्वप्नील कुमरे या दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले, विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच पाठयपुस्तकाबाहेरचे शिक्षण देणे गरजेचे आहे. विशेषतः जागरुक व संवेदनशिल नागरिक होण्यासाठी प्रत्येकाने भारतीय संविधान समजून घेतले पाहिजे. १९३७ या प्रांतीय निवडणुकांपासूनच लोकशाहीचे पाळेमुळे रोवण्यास सुरुवात झाली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व राज्यघटनाचा अभ्यास करुन संविधानाची निर्मिती केली. प्रत्येक घटकांचा विचार करुन तयार केलेले हे आदर्श संविधान आहे. मात्र आजही उत्तम काम करणारी माणसे निवडणुक जिंकतीलच याची हमी देता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सजग व देशाप्रती प्रामाणिक रहावे, अशी अपेक्षाही हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतीय राष्ट्राची प्रगती होईल, असेही ते म्हणाले. तर शाश्वत विकास असल्याशिवाय लोकप्रसाशन व लोकशाही देखील यशस्वी होऊ शकत नाही, असे अध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे म्हणाले.
राज्यघटनेत कलम २१ मध्ये महत्वाच्या तरतुदी आहेत, असेही ते म्हणाले.’सार्वजनिक धोरण’ यशस्वी झाल्याशिवाय शासन, प्रशासन व लोकशाही विकसीत होत नाही, असे डॉ.पारसमल बोरा म्हणाले. तर मानव्य विद्या शाखेतील क उपक्रमशिल विभाग असलेल्या विभागाचे ’लोकप्रशासन आणि सार्वजनिक धोरण’ हा नामविस्तार आनंददायी आहे, असे विभागप्रमुख डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले. लोकप्रशासन विषयात आपल्या विभाागातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी आजपर्यंत मोठे योगदान दिले आहे. प्रशासन हे अधिकाधिक लोकाभिमूख विकसनशील व पारदर्शक असावे, अशी जगभर सध्या त्रिसुत्री आहे. त्यामुळे ’पब्लिक अॅडमिनस्ट्रेशन’ सोबतच ’पब्लिक पॉलीसी’ अशा नावाचा अंतर्भाव करण्यात आला. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमातही योग्य बदल करण्यात येतील, असे डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले.
राज्यपालाचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे यांचे भाषण झाले. ते म्हणाले, सरदार वल्लभाई पटेल यांना भारतीय नागरी सेवेचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रशासनातील लोकांनी ’आयव्हरी टॉवर’मध्ये न राहता अधिका लोकाभिमुख व जमिनीवर राहुन काम केले पाहिजे. जगभरात लोकप्रशास हा स्वातंत्र विषय विकसीत होऊन सुमारे १४० वर्षे लोटली आहेत. वड्रो विल्सन हे लोकप्रशासनाचे पितामह असून आज हा अत्यंत महत्वाचा विषय ठरला आहे. लोकप्रशासन हा सिंध्दांत असून सार्वजिक धोरण हे प्रात्यक्षिक आहे. त्यामुळे विभागात नामविस्तार अत्यंत योग्य आहे. विशेषतः नवीन शैक्षणिक धोरणाचेही सुसंगत हा निर्णय असल्याचेही डॉ.नारनवरे म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis