नांदेड - कडधान्य अभियान अंतर्गत तूर व हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ
नांदेड, 06 मार्च, (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील धनज येथील मृष्णेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धनज येथे शासनाच्या आत्मनिर्भर कडधान्य अभियान अंतर्गत तूर व हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आले आहे. नाफेडचे मॉडेल खरेदी केंद्र म्हणून ओळख असले
नांदेड - कडधान्य अभियान अंतर्गत तूर व हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ


नांदेड, 06 मार्च, (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील धनज येथील मृष्णेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धनज येथे शासनाच्या आत्मनिर्भर कडधान्य अभियान अंतर्गत तूर व हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आले आहे.

नाफेडचे मॉडेल खरेदी केंद्र म्हणून ओळख असलेल्या धनज मुख-`ड येथील मृप्नेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड खरेदी केंद्रावर शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत तूर आणि हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभव्यवस्थापकीय संचालक प्रल्हाद पाटील बोडके यांच्या शुभहस्ते विधिवत वजन काट्याची पूजा करून करण्यात आले आहे.

यावेळी एकलारा येथील शेतकरी दिगंबर पाटील हसणाळे व प्रतनिरीक्षक ग्रेडर बालाजीराव बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर केंद्र हे नाफेड अंतर्गतचे मॉडेल खरेदी केंद्र असून या ठिकाणी विक्रीस आणलेल्या मालाचे मूल्य पैसे पोहोचल्याच्या शासनाला माल ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सुविधा या नाफेडच्या मॉडेल खरेदी केंद्रावर उपलब्ध आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांनी आपले कडधान्य तूर आणि हरभरा धनंज येथील नाफेडच्या मॉडेल खरेदी कें-द्रावर विक्रीस आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande