
जळगाव, 06 मार्च (हिं.स.) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई सुरू केली आहे. वारंवार गुन्हेगारी कृत्यांमुळे शांतता भंग करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले असून याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाने विशेष मोहीम राबवली आहे. विविध पोलीस ठाण्यांकडून सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. या प्रस्तावांवर सुनावणी घेतल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ व ५७ अंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आली.कारवाई अंतर्गत सुनील पांडुरंग पारधी व विजय पांडुरंग पारधी (दोघे राहणार फत्तेपूर, ता. जामनेर), अमोल ऊर्फ चिक्या शंकर कोकाटे (हरिविठ्ठल नगर जळगाव), महेंद्र ऊर्फ दादू समाधान सपकाळे, उमेश ऊर्फ उमाकांत दत्तात्रेय धोबी (रा. पिंप्राळा, जळगाव) आणि फिरोजशहा नूर शहा (मोमीन मोहल्ला, नशिराबाद) या सहा जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर