राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरल्या सोलापूर जिल्ह्यातील तिसऱ्या नेत्या
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। राज्यसभेच्या सात जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मास्टर स्ट्रोक’ खेळत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सोलापूरच्या प्रा. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली.
Waghmare


सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। राज्यसभेच्या सात जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मास्टर स्ट्रोक’ खेळत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सोलापूरच्या प्रा. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली. सर्वसामान्य घरातून आलेल्या वाघमारेंना संधी देत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. ज्योती वाघमारे यांच्या रूपाने सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे वाघमारेंना दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळाले आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपकडून चार नावे जाहीर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना संधी दिली, तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे आणि राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत होती. मात्र, शिंदे यांनी सर्वसामान्य घरातून पुढे आलेल्या वाघमारेंना संधी देण्याचा निर्णय घेतला. सात जागांसाठी सातच उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे ही निवड बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande