जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता समुपदेशन शिबीर संपन्न
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा तसेच त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय कौशल्य विकास, र
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता समुपदेशन शिबीर संपन्न


सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा तसेच त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र संगीता खंदारे, माजी कौशल्य विकास अधिकारी दत्तात्रय देवळे तसेच जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक तज्ञ समुपदेशक/अधिकारी पार्थ तेरकर यांनी उपस्थितांना तालुका व जिल्हास्तरावर उपलब्ध असलेल्या विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती दिली. याशिवाय अल्पबचत गट स्थापन करून स्वावलंबनाच्या संधी कशा निर्माण करता येतील, याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या शिबिराला जिल्ह्यातील एकूण ५५ माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता योजनांची पार्श्वभूमी दत्तात्रय देवळे यांनी मांडली. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजीव व्यंकटराव पवार यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande