आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंक सुरू
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.) :मध्यपूर्व (आखाती) देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे अचूक स्थान व आवश्यक माहिती मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून ‘नवीन सहाय्यता गल्फ’ ही विशेष लिंक सुरू करण्यात आली आहे. सोलापूर
Collactor kumar


सोलापूर, 06 मार्च (हिं.स.) :मध्यपूर्व (आखाती) देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे अचूक स्थान व आवश्यक माहिती मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून ‘नवीन सहाय्यता गल्फ’ ही विशेष लिंक सुरू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जे नागरिक सध्या आखाती देशांमध्ये अडकले आहेत, त्यांनी तातडीने या लिंकवर जाऊन आपली माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या उपक्रमामुळे शासनाला अडकलेल्या नागरिकांचे अचूक ठिकाण समजून घेणे आणि त्यांना आवश्यक ती मदत पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनीही ही लिंक संबंधित व्यक्तींना पाठवून त्यांना माहिती भरायला सांगावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या प्रक्रियेमुळे अडकलेल्या नागरिकांचा ठावठिकाणा शासनाला लवकर मिळेल आणि मदतकार्य अधिक वेगाने राबविता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या संदर्भात कोणतीही शंका किंवा अधिक माहिती हवी असल्यास नागरिकांनी जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे संपर्क साधावा. यासाठी (०२१७) २७३१०१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande