
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) प्रवाशांच्या शिस्तबद्ध आणि सुरक्षित प्रवासासाठी; तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी स्थानकांवर स्वयंचलित फाटक यंत्रणा (ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन -एएफसी) या अद्ययावत प्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वैध तिकीट किंवा कार्ड यंत्रणेला कार्ड दाखवल्यानंतरच (स्कॅन) पुढील प्रवासासाठी दरवाजे उघडले जाणार आहेत.
‘महामेट्रो’च्या स्थानकांवरील ‘एएफसी’ फाटकाबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या रांगा लागत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर ‘महामेट्रो’ने या तंत्रज्ञान प्रणालीत सुधारणा केली आहे.प्रवासी समाेर आल्यानंतर व्यवस्थित कागदी तिकीट किंवा मोबाईलवर प्राप्त होणारा क्यूआर कोड अथवा मेट्रो कार्ड यशस्वी स्कॅन केल्यानंतरच दरवाजे उघणार आहेत. त्यानंतर प्रवाशाला आत किंवा बाहेर येणे शक्य होणार आहे, असे ‘महामेट्रो’कडून स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु