वैशाली बौद्ध विहार जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी ओमकार सिरसाठ यांची निवड
बाबासाहेबांची १३५ वी जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार लातूर, 06 मार्च (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी १३५ व्या जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, लातूरमधील प्रसिद्ध ''तीर्थ'' दर्जा प्राप्त वैशाली सार्वजनिक बौद्ध विहार,
ओमकार सिरसाट


बाबासाहेबांची १३५ वी जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार

लातूर, 06 मार्च (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी १३५ व्या जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, लातूरमधील प्रसिद्ध 'तीर्थ' दर्जा प्राप्त वैशाली सार्वजनिक बौद्ध विहार, बौद्ध नगर येथील जयंती मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी ओमकार सिरसाठ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, यंदाची जयंती केवळ मिरवणुकीपुरती मर्यादित न ठेवता वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

नवनिर्वाचित अध्यक्ष ओमकार सिरसाठ यांच्यासोबतच विविध पदांवर तरुण आणि उत्साही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे:

उपाध्यक्ष: मयूर कांबळे

कोषाध्यक्ष: ऋषिकेश कांबळे

सहकोषाध्यक्ष: आदित्य सिरसाट

सचिव: निलेश कांबळे

संरक्षण प्रमुख: यश कांबळे

मिरवणूक प्रमुख: अतिष मस्के

संघटक: अशुतोष बनसोडे

सह संघटक: जय कांबळे

सल्लागार: रवी सोनावते

सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांवर भर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन यावर्षीची जयंती अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. केवळ उत्सव न करता समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी या उद्देशाने अध्यक्षीय मंडळाने आरोग्य शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन केले आहे.

आकर्षणाचे केंद्र ठरणार 'वैशाली विहार' - वैशाली सार्वजनिक बौद्ध विहार हे लातूर शहरातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे. या विहाराने शहरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदा या मंडळाची धुरा तरुण पिढीच्या हाती असल्याने आणि त्यांच्या नियोजित वैचारिक उपक्रमांमुळे, लातूरमधील जयंती उत्सवाचे हे प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे परिसरातून अभिनंदन होत असून, भीम जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande