रायगडमध्ये १० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल
रायगड, 06 मार्च (हिं.स.) । खालापूर पोलीस ठाणे हद्दीत १० लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे चौक, ता. खालापूर येथील बेव्ह्
Online fraud of Rs 10 lakhs through IMPS; Case registered with Khalapur police


रायगड, 06 मार्च (हिं.स.) । खालापूर पोलीस ठाणे हद्दीत १० लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे चौक, ता. खालापूर येथील बेव्ह्यू रेसिडेन्सी, प्लॉट क्रमांक ३०१, ‘अ’ विंग, तिसरा मजला येथे राहणाऱ्या फिर्यादी यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून अज्ञात आरोपीने फसवणूक केली. आरोपीने फिर्यादींच्या संमतीशिवाय आयएमपीएस ऑनलाईन व्यवहार प्रणालीचा वापर करून १० लाख रुपये खात्यातून परस्पर ट्रान्सफर केले, ज्यामुळे फिर्यादीला मोठी आर्थिक हानी झाली.

या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२६ नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 कलम ३१८(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन व्यवहार करताना नेहमी सावधगिरी बाळगा आणि अनोळखी लिंक, कॉल किंवा अॅपच्या माध्यमातून कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये.

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande