छ. संभाजीनगर - पाण्यासाठी औद्योगिक परिसरात धिंगाणा; आंदोलक ताब्यात
छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. औद्योगिक परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी संताप व्यक्त करत पोलिसांच्या अंगावर मडकी फो
छ. संभाजीनगर - पाण्यासाठी औद्योगिक परिसरात धिंगाणा; आंदोलक ताब्यात


छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. औद्योगिक परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी संताप व्यक्त करत पोलिसांच्या अंगावर मडकी फोडली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत नागरिकांनीही रोष व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande