
पुणे, 06 मार्च, (हिं.स.)। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांच्यावर वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याने वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत लहाडे दारू पिला होता त्याला बोलता येत नव्हतं ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत होता, असं वक्तव्य मोरे यांनी केलं होतं असं फिर्यादीत म्हटले आहे. लहाडे यांनी यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वसंत मोरे यांनी बदनामी केली त्यामुळे कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे असं तक्रारीत नमूद केलं होतं. या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ लहाडे हे ठेकेदार असून ते ७२ वर्षांचे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु