
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका व प्रिसिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन नगरसेवकांसाठी 15 मार्च रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिकेच्या निवडणुका झाल्या महापालिकेमध्ये खऱ्या अर्थाने लोकनियुक्त सत्ता स्थापन झाली आहे प्रिसिजन फाउंडेशन व सोलापूर महापालिकेच्या संयुक्त विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेत महापालिका प्रशासन,अर्थक कारण व नागरी व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी रामभाऊ माळगी प्रबोधनी येथील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांकडून महापालिका रचना, अर्थसंकल, व निधी व्यवस्थापन, प्रभाग व्यवस्थापन, तसेच प्रभावी संवाद कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी नऊ वाजता चिंचोली एमआयडीसी येथील हॉटेल रीजेंन्टा येथे होणार असून या कार्यशाळेस सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड