दक्षिण सोलापूरमध्ये आधुनिक कृषी भवन व ॲग्री मॉल उभारण्याचा प्रस्ताव
सोलापूर, 06 मार्च, (हिं.स.)। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आधुनिक कृषी भवन व कृषी बाजारपेठ (ॲग्री मॉल) उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही
ghfgh


सोलापूर, 06 मार्च, (हिं.स.)। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आधुनिक कृषी भवन व कृषी बाजारपेठ (ॲग्री मॉल) उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने ती आयोजित करण्यात आली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी विकास, सिंचन सुविधा आणि शेतकरी हिताच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी पायाभूत सुविधा मजबूत करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज व आधुनिक कृषी भवन उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या भवनामध्ये मध्यवर्ती कृषी कार्यालय, शेतकरी निवास (रेस्ट हाऊस), प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र तसेच शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट व्यवहार होण्यासाठी कृषी बाजारपेठ अर्थात ॲग्री मॉल उभारण्याचा विचार आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी सामुदायिक व वैयक्तिक शेततळ्यांची संख्या वाढविण्याबाबत चर्चा झाली. सीना व भीमा नदीच्या पाण्याचा योग्य वापर करून जलसंधारण व सूक्ष्म सिंचन योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील काही भागात चुकीच्या पाणी व्यवस्थापनामुळे जमिनी क्षारयुक्त होत असल्याने त्या जमिनींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यासाठी मृदा आरोग्य सुधारणा कार्यक्रम व जनजागृती मोहिमा राबविण्याबाबतही चर्चा झाली.दक्षिण सोलापूर परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता येथे स्वतंत्र ऊस संशोधन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. या माध्यमातून ऊस वाण संशोधन, कीड व रोग नियंत्रण तसेच उत्पादनवाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तसेच “एक गाव – एक पीक” योजना प्रभावीपणे राबविणे आणि बोगस बियाणे, खते व कीटकनाशक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande