उदगीर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीसाठी ९ मार्च रोजी विशेष सभा
लातूर, 06 मार्च (हिं.स.)। : जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी पहिली विशेष सभा दि. ९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशानुसार दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी
उदगीर पंचायत समिती


लातूर, 06 मार्च (हिं.स.)।

: जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी पहिली विशेष सभा दि. ९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशानुसार दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेश क्रमांक २०२६/जिपपंस/निवडणूक/कवि-५५४ नुसार लातूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी दि. ९ मार्च २०२६ रोजी पहिली सभा घेण्यात येणार आहे.

या अनुषंगाने उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठीची सभा दि. ९ मार्च २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी सुशांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती, उदगीर येथे आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, उदगीर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला) अशी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande