पुणे - स्थायी समितीतील बैठकीमुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। ठेकेदारांमध्ये काम मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये महापालिकेने निश्चित केलेल्या पूर्व अंदाजपत्रकाच्या तुलनेत४० ते ५० टक्के कमी दराने निविदा भरल्या जात आहेत. त्यामुळे कामाची गुणवत्ता राहात नसल्याने पैसे वाया जात आहेत. आता यावर मह
पुणे - स्थायी समितीतील बैठकीमुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले


पुणे, 06 मार्च (हिं.स.)। ठेकेदारांमध्ये काम मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये महापालिकेने निश्चित केलेल्या पूर्व अंदाजपत्रकाच्या तुलनेत४० ते ५० टक्के कमी दराने निविदा भरल्या जात आहेत. त्यामुळे कामाची गुणवत्ता राहात नसल्याने पैसे वाया जात आहेत. आता यावर महापालिका प्रशासनातर्फे बंधने घातली जाणार असून, एका ठरावीक मर्यादेपेक्षा कमी दाराच्या निविदा आल्यास त्या फेटाळून लावल्या जाणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर ठेकेदारांचे धाबे दणाणेल आहेत.

पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी देखभाल दुरुस्तीची कामे आणि नवीन भांडवली कामे करण्यासाठी हजारो निविदा काढल्या जातात. त्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे २७५० कोटीची कामे केली जातात. तर सुमारे ५५०० कोटी पेक्षा जास्त रकमेची नवीन कामे सुचविली जातात. महापालिका प्रशासनाकडून या कामांसाठी किती खर्च होऊ शकतो याचा अभ्यास करून तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार पूर्वगणनपत्रक तयार केले जाते. त्यास पूर्वगणनपत्रक समितीची मान्यताही मिळालेली आहे. पण या निविदा मिळविण्यासाठी ठेकेदारांमध्ये असलेल्या प्रचंड स्पर्धेमुळे ठेकेदार कमी दराची निविदा भरतात. यामध्ये पूर्वगणनपत्रकाच्या १ टक्के कमी दरांपासून ते ५०-५५ टक्क्यांपर्यंत कमी दाराच्या निविदा गेल्या वर्षभरात आलेल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande