मुंबई : राज्य नाट्य स्पर्धेत डोंबिवलीचे दगडी भिंत नाटक प्रथम
मुंबई, 6 मार्च, (हिं. स.) : चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली या संस्थेच्या दगडी भिंत या नाटकासाठी रु. ६ लाखाचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनाल
दगडी भिंत नाटकातील एक दृश्य


मुंबई, 6 मार्च, (हिं. स.) : चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली या संस्थेच्या दगडी भिंत या नाटकासाठी रु. ६ लाखाचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आज केली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ही अंतिम स्पर्धा २ फेब्रुवारी, २०२६ ते १ मार्च २०२६ या कालावधीत रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात अतिशय जल्लोषात पार पडली. अंतिम फेरीत एकूण ४६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

स्पर्धेतील अन्य निकाल असे -

नटराज नाट्य कला मंडळ, बारामती या संस्थेच्या कर्ण या नाटकास रु. ४ लाखाचे द्वितीय पारितोषिक आणि नवहिंद बालमित्र मंडळ, मुंबई या संस्थेच्या द हिंदू लेडी या नाटकासाठी रु.२ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक आशुतोष वाघमारे (नाटक-दगडी भिंत) द्वितीय पारितोषिक- कल्पिता राणे (नाटक-कर्ण) तृतीय पारितोषिक- शिवानी पेडणेकर (नाटक-द हिंदू लेडी)

नेपथ्य: प्रथम पारितोषिक- वृशांक कवठेकर (नाटक-दगडी भिंत) द्वितीय पारितोषिक- संजय सुतार (नाटक-युटोपिया) तृतीय पारितोषिक- ओंकार चौगुले (नाटक-मी कुमार)

प्रकाश योजना: प्रथम पारितोषिक- विनोद राठोड (नाटक-दगडी भिंत) द्वितीय पारितोषिक- चेतन ढवळे (नाटक-कर्ण) तृतीय पारितोषिक- सुनिल मेस्त्री (नाटक-द हिंदू लेडी)

रंगभूषा : प्रथम पारितोषिक- उल्लेश खंदारे (नाटक-दगडी भिंत) द्वितीय पारितोषिक- डॉ. राजश्री खटावकर (नाटक-वसुभूमी) तृतीय पारितोषिक- दताजी जाधव (नाटक-काळाच्या पंजातून)

संगीत दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक ओमकार जाधव (नाटक-दगडी भिंत) द्वितीय पारितोषिक- भुषण भावसार (नाटक-कर्ण) तृतीय पारितोषिक- अभिजीत पटवर्धन (नाटक-वामन आख्यान)

उत्कृष्ट अभिनय : (रौप्यपदक)

पुरुष कलाकार:- हर्षवर्धन कारंडे-देशमुख (नाटक-मी कुमार), मिनार पाटील (नाटक-अग्नीपंख), प्रा. दिपक आमोलकर (नाटक-द लास्ट सेल), वैभव देशमुख (नाटक-दशानन), प्रताप सोनाळे (नाटक-तिचे संदर्भ नसलेली गोष्ट), सुमित घाग (नाटक-ब्रेकपॉइंट), संतोष पाटील (नाटक-पोकळ घिस्सा), ओम चव्हाण (नाटक-सखा), इरफान मुजावर (नाटक-युटोपिया), मनोज डाळीम्बकर (नाटक-एक एक पान गळावया).

स्त्री कलाकार :- श्रुती गणपुले (नाटक-दगडी भिंत), कल्पिता राणे (नाटक-कर्ण), निखिला इनामदार (नाटक-दगडी भिंत), रुपाली राऊत (नाटक-बरड), शिवानी पेडणेकर (नाटक-द हिंदू लेडी), संपदा भोसले (नाटक-अविघ्नेया), प्रियांका जंगम (नाटक-रेशनकार्ड), आश्विनी आंचवले-कुलकर्णी (नाटक-अय...), केतकी भालवणकर (नाटक- वामन आख्यान), भावना रहाटे (नाटक-ती...ती...आणि ती...)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे :-

स्त्री कलाकार :- निखिल टोंगळे (नाटक-रणमर्द), परसू गावडे (नाटक-हायब्रीड), प्रणव भोसले (नाटक-भिरुड), प्रदिप वाळके (नाटक-अय...), चंद्रकांत शिंदे (नाटक-वारकरी)

पुरुष कलाकार :- विजयालक्ष्मी कोकणे (नाटक-राहिले दूर घर माझे), श्रावणी ओव्हाळ (नाटक-अविघ्नेया), चैत्राली राजे (नाटक-डोंगरार्त), स्नेहल राऊत (नाटक-तांडा), अंजली कुलकर्णी (नाटक-टेक अ चान्स).

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. राजा अत्रे, श्री. संजय हळदीकर, श्री. मंगेश नेहरे, श्री. पद्मनाभ पाठक आणि श्रीमती प्रिया नेर्लेकर यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या हौशी मराठी नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.

हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार हौशी मराठी नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande