‘सखे गं साजणी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमधून तीन मित्रांच्या आयुष
‘सखे गं साजणी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला”


मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमधून तीन मित्रांच्या आयुष्यातील प्रवास, त्यांची मैत्री आणि भावनिक क्षणांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते.

या चित्रपटात प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर ही दमदार तिकडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरेच काही’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रार्थना बेहरेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, तर ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’ सारख्या चित्रपटांमधून पूजा सावंतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर ‘मी पन सचिन’, ‘बाबू बँड बाजा’ सारख्या चित्रपटांमधून अभिजीत खांडकेकरनेही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट Redbulb Studios च्या बॅनरखाली बनत आहे. थायलंडमधील सुंदर लोकेशन्सवर शूट झालेल्या या चित्रपटातून मैत्रीचा एक वेगळा प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

टीझरमध्ये दिसणारी मस्ती, प्रवास आणि भावनिक क्षण प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande