
नांदेड, 06 मार्च, (हिं.स.)। कै. सौ. भिमाबाई पांडुरंगराव पुंडे स्मृती मातोश्री भिमाई व्याख्यानमाला तसेच गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शांतीनगर, मुखेड येथे करण्यात आले आहे. या प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गारगोटी (कोल्हापूर) येथील युवराज पाटील यांचे' चला कुटुंब जपूया' या विषयावर व्याख्यान होणार असून, त्याद्वारे व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प गुंफले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र येवती मठसंस्थानचे मठाधिपती सदगुरू नराशाम महाराज राहणार असून आमदार डॉ. तुषार राठोड, नगराध्यक्ष विजया देबडवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या
शानदार सोहळ्यात 'ग्लोबल एक्सपर्ट इमर्जन्सी मेडिकल फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड, मुंबई' येथील डॉ. संदीप बालनराव गोरे यांना 'गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानपुष्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमाला संयोजन समितीचे प्रमुख मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, सौ. माला पुंडे, संजय पुंडे, डॉ. गौरव पुंडे, डॉ. तेजस्विनी पुंडे तसेच संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis