यंदाचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर; पाच महिलांचा होणार सन्मान
रायगड, 06 मार्च (हिं.स.)। विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘तेजस्विनी पुरस्कार’ यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे. समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या पाच महि
This year's Tejaswini Awards announced; Five women will be honored


रायगड, 06 मार्च (हिं.स.)। विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘तेजस्विनी पुरस्कार’ यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे. समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या पाच महिलांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

यंदाच्या तेजस्विनी पुरस्कारासाठी वंदना सुर्वे, देविका पाबेकर, सारा वर्तक, प्राची देवळे आणि प्रियांका घरत यांची निवड करण्यात आली आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. ७) सकाळी १० वाजता अलिबाग येथील रायगड पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमात निवड झालेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

या समारंभाला रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील तसेच रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याचा सन्मान व्हावा तसेच समाजातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही निवड झालेल्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून या कार्यक्रमाबद्दल परिसरात उत्सुकता व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande