ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र; सात दिवसांत 4.22 कोटींची वसुली
ठाणे, 06 मार्च, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून दि. 27 फेब्रुवारी ते 05 मार्च 2026 या कालावधीत शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून एकूण 4 कोटी 22 लाख 35 हजार 750 रुपयां
ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र; सात दिवसांत 4.22 कोटींची वसुली


ठाणे, 06 मार्च, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून दि. 27 फेब्रुवारी ते 05 मार्च 2026 या कालावधीत शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून एकूण 4 कोटी 22 लाख 35 हजार 750 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. थकीत देयकदारांवर कठोर कारवाई करत 103 पाणी जोडण्या तोडण्यात आल्या असून 177 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 3 ठिकाणचे पंप जप्त करण्यात आले असून तर 1 पंप रुम सील करण्यात आला आहे.

या कालावधीत प्रभाग समितीनिहाय वसुलीमध्ये मानपाडा प्रभाग समितीतून 1,14,65,750 रुपयांची वसुली करण्यात आली. कळवा प्रभाग समितीतून 59,05,557 रुपयांची वसुली करण्यात आली असून 35 जणांचे नळ संयोजन खंडीत करण्यात आले. नौपाडा प्रभाग समितीतून 52,98,941 रुपयांची वसुली करण्यात आली तर 31 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 60 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीतून 49,94,751 रुपयांची वसुली करण्यात आली असून 5 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 20 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच उथळसर प्रभाग समितीतून 36,61,836 रुपयांची वसुली करण्यात आली असून 4 जणांची नळसंयोजन खंडीत करण्यात आली.

लोकमान्य-सावरकर नगर प्रभागातून 31,37,858 रुपयांची वसुली करण्यात आली असून 10 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली असून 97 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वागळे प्रभागातून 25,13,857 रुपयांची वसुली करण्यात आली. दिवा प्रभागातून 23,64,631 रुपयांची वसुली करण्यात आली असून 18 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 3 ठिकाणचे पंप जप्त तर 1 पंप रुम सील करण्यात आला. मुंब्रा प्रभागसमितीतून 16,60,158 रुपयांची वसुली करण्यात आली. तर नागरी सुविधा केंद्राअंतर्गत 12,32,411 रुपयांची वसुली करण्यात आली.

महापालिकेची ही वसुली मोहिम यापुढेही अधिक तीव्र होणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले असून नागरिकांनी थकीत पाणीपट्टी तातडीने भरून कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande