पुणे - व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची सीआयडीकडून चौकशी
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृ्त्यू झाल्
पुणे - व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची सीआयडीकडून चौकशी


पुणे, 06 मार्च (हिं.स.)। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृ्त्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे विमानातून निघाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत आले होते. एकाच दिवशी त्यांच्या बारामती परिसरात चार सभा होणार होत्या. सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना अपघात झाला. या अपघातात पवार यांच्यासह वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यृ झाला. विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बारामती पोलीस ठाण्यातील दाखल प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande