सिंबायोसिस तर्फे  ‘संजीवनी’ महिला सक्षमीकरण उपक्रमाचा शुभारंभ
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। - आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सिंबायोसिसतर्फे संजीवनी - तिला एक चांगले जीवन देणे, (“Sanjivani – Giving Her a Better Life,” ) या महिला सक्षमीकरणासाठी च्या प्रमुख उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. हा कार्
सिंबायोसिस तर्फे  ‘संजीवनी’ महिला सक्षमीकरण उपक्रमाचा शुभारंभ


पुणे, 06 मार्च (हिं.स.)। - आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सिंबायोसिसतर्फे संजीवनी - तिला एक चांगले जीवन देणे, (“Sanjivani – Giving Her a Better Life,” ) या महिला सक्षमीकरणासाठी च्या प्रमुख उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे हिलटॉप येथील प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला आहे.

“संजीवनी” या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच सामाजिक उन्नतीसाठी ठोस प्रयत्न करणे हा उद्देश आहे. या उपक्रमाद्वारे सिंबायोसिस कडून समावेशक विकास आणि सामाजिक बांधिलकी याबाबतची आपली वचनबद्धता अधिक दृढ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिंबायोसिस चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत तसेच सिंबायोसिस च्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande