सांगोला तालुक्यात मंडळ अधिकाऱ्याच्या चालकाला ७ हजारांची लाच घेताना अटक
सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडळ अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडळ अधिकाऱ्याच्या खाजगी चालकाला ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची कारवाई केली. या प्रकरणी मंडळ अधिकारी विजया महारुद
अटक लोगो


सोलापूर, 06 मार्च (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडळ अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडळ अधिकाऱ्याच्या खाजगी चालकाला ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची कारवाई केली. या प्रकरणी मंडळ अधिकारी विजया महारुद्र नाईक (रा. इसबावी, ता. पंढरपूर) व त्यांचा खाजगी चालक वैभव पिराजी मोरे (रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र हिम्मत लांभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार विनोद सिताराम सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी विजया नाईक यांच्या वतीने १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ७ हजार रुपयांवर ठरविण्यात आली. या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष केली. त्यावेळी मंडळ अधिकारी नाईक यांनी चालक वैभव मोरे यांच्या मार्फत लाच मागणीस दुजोरा दिल्याचे आढळून आले. त्यानंतर गुरुवारी संगेवाडी मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande