अर्थसंकल्पात पुण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात पुण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे मुंबई-हायस्पीड ट्रेनमुळे शहराच्या विकासात मोलाची भर पडणार आह
अर्थसंकल्पात पुण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस


पुणे, 06 मार्च (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात पुण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे मुंबई-हायस्पीड ट्रेनमुळे शहराच्या विकासात मोलाची भर पडणार आहे. तसेच शहरातील मेट्रो जाळे वाढवणार असून पुणे मेट्रो-२ ला मंजुरी दिली असल्याचेही सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले की, मुंबई व पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुरंदर विमानतळासाठी विशेष प्राधिकरणासाठी स्थापना केली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पुण्यात ३० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. पुण्यातील कात्रज- येरवडा भुयारी मार्गाचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार आहे.

पुणे- लोणावळा तिसऱ्या मार्गिकेला मंजुरी दिली असून यासाठी ५१०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पुणे (शिरुर )- छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे.तसेच हडपसर- यवत या ३१ किलोमीटरच्या सहापदरी मार्ग, शिवाय चाकण तळेगाव, तळेगाव शिक्रापूर या उन्नत मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय बारामती विमानतळावर नाईट लॅंडिगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. बारामती आणि पुंरदर मधील दुष्काळ कमी करण्यासाठी निरा-कऱ्हा जोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande