पुणे - कमी वेळेत तक्रारी सोडविणाऱ्यांना मिळणार बक्षीस
पुणे, 06 मार्च (हिं.स.)। ‘महापालिकेकडे केल्या जाणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठी ‘पीएमसी केअर’ अॅपमध्ये आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. महापालिकेबाबत आमदार, खासदार यांच्याकडे केल्या जाणाऱ्या तक्रारींची नोंद महापालिकेकडून घेऊन त्याचे निवार
पुणे - कमी वेळेत तक्रारी सोडविणाऱ्यांना मिळणार बक्षीस


पुणे, 06 मार्च (हिं.स.)। ‘महापालिकेकडे केल्या जाणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठी ‘पीएमसी केअर’ अॅपमध्ये आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. महापालिकेबाबत आमदार, खासदार यांच्याकडे केल्या जाणाऱ्या तक्रारींची नोंद महापालिकेकडून घेऊन त्याचे निवारण केले जाईल.

पुणे महापालिकेकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण होईपर्यंत त्याची सद्यःस्थिती नागरिकांना पाहता येणार आहे. जे अधिकारी, कर्मचारी कमी वेळेत तक्रार निकाली काढतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना सुरु केली जाईल,’ अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.

‘शहरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या पाच रुग्णालयांत आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देताना रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत,’ असे महापौर नागपुरे यांनी सांगितले. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महापौर म्हणून काम करताना असलेल्या आव्हानांची माहिती तसेच गेल्या महिनाभरात जाणवलेल्या समस्यांबाबत नागपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande