पुणे - बेकायदा बांधकाम झाल्यास अभियंत्यांवर जबाबदारी
पुणे, 06 मार्च, (हिं.स.)। शहरातील विविध भागांत होणाऱ्या बेकायदा बांधकामाची जबाबदारी आता कनिष्ठ तसेच सहाय्यक अभियंत्यांवर टाकली जाणार आहे. लोहगाव, विमाननगर भागात पाच ते सात मजली बेकायदा इमारतींवर महापालिकेने कारवाई करून त्या पाडून टाकल्या. याचे पडसा
PMC news


पुणे, 06 मार्च, (हिं.स.)। शहरातील विविध भागांत होणाऱ्या बेकायदा बांधकामाची जबाबदारी आता कनिष्ठ तसेच सहाय्यक अभियंत्यांवर टाकली जाणार आहे. लोहगाव, विमाननगर भागात पाच ते सात मजली बेकायदा इमारतींवर महापालिकेने कारवाई करून त्या पाडून टाकल्या. याचे पडसाद नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

‘या भागात बेकायदा इमारती उभ्या राहत असताना प्रशासनातील अधिकारी काय करत होते,’ असा प्रश्न विचारण्यात आला. ‘यापुढील काळात बेकायदा बांधकामासाठी संबधित कनिष्ठ तसेच सहाय्यक अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल,’ असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी पत्रकार परिषद घेतली. भिमाले म्हणाले, ‘खराडी, विमाननगर, लोहगाव परिसरातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. इतक्या उंच इमारती बेकायदा उभ्या राहत असतानाही अभियंत्यांचे दुर्लक्ष कसे झाले, अशी विचारणा या वेळी करण्यात आली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही याबाबत योग्य ती कार्यवाही करून जबाबदारी निश्चित केली जाईल, असे सांगितले.’

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande