ठाणे - राष्ट्रवादी (श.प.) च्या वतीने महिला दिनी मोफत आरोग्य शिबिर
ठाणे , 06 मार्च (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ॠताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत महिलाध्यक्षा मनिषा भगत, कार्य
ठाणे - राष्ट्रवादी (श.प.) च्या वतीने महिला दिनी मोफत आरोग्य शिबिर


ठाणे , 06 मार्च (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ॠताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत महिलाध्यक्षा मनिषा भगत, कार्याध्यक्षा फुलबानो पटेल आणि साबिया मेमन यांनी महिला दिनी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

घर-संसार सांभाळणाऱ्या मायभगिनी सर्व आघाड्यांवर मोठ्या हिमतीने कार्यरत असल्या तरी स्वतःच्या प्रकृतीकडे फारसे लक्ष देत नसतात. त्यातच संसाराचा गाडा हाकताना दोन पैसे वाचविण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. ही बाब ध्यानात घेऊन 8 मार्चच्या महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या शिबिराचे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, तुळजाभवानी मंदिराशेजारी, गणेशवाडी पांचपाखाडी ठाणे येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सिद्धीविनायक हाॅस्पीटलचे तज्ज्ञ वैद्यकीय पथक महिलांची मोफत तपासणी करणार आहेत. जनरल चेक अप, हृदयरोग तपासणी, (ECG), किडनी, स्वादुपिंड, यकृत उपचार, दमा, रक्तदाब, मधुमेह (शुगर), कॅन्सर रोग सल्ला आणि मोफत ऑपरेशन स्त्रियांची आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास किडनी स्टोन प्रोस्टेटवर मोफत शस्त्रक्रिया, मोफत डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिलाध्यक्षा मनिषा भगत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande