बीड - लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात
बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। सिरसाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराचा उसाने भरलेला ट
बीड - लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात


बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। सिरसाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराचा उसाने भरलेला ट्रॅक्टर काही शेतकऱ्यांनी अडवून धरला होता, तो बाहेर काढण्यासाठी मदत केल्याच्या बदल्यात याने 'चहापाणी'च्या नावाखाली दोन हजार रुपयांची लाच मागितली होती.

याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच बीड एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. ही धडक कारवाई एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रदीप सुरवसे, बिडकर, काळे आणि म्हेत्रे यांनी पार पाडली. सध्या सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या घटनेने पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande