सोलापूर - नगरसेविकेच्या पतीवर अनधिकृत बांधकामचा गुन्हा दाखल
सोलापूर, 01 एप्रिल (हिं.स.)। माजी महापौर मनोहर सपाटे व ज्ञानेश्वर सपाटे यांचेवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात प्राचीन स्मारक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुईकोट किल्ला हा शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला असून त्याच्या संरक्षि
Kdoe


सोलापूर, 01 एप्रिल (हिं.स.)। माजी महापौर मनोहर सपाटे व ज्ञानेश्वर सपाटे यांचेवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात प्राचीन स्मारक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुईकोट किल्ला हा शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला असून त्याच्या संरक्षित भिंतीपासून 300 मीटर परिसरात कोणतेही बांधकाम, दुरुस्ती किंवा खोदकाम करण्यास मनाई आहे. असे असताना संबंधित आरोपींनी पुरातत्व विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पुरातत्व विभागातील कर्मचारी ऋषिराज सिंह सोलंकी यांनी तक्रार दिली असून त्यानुसार खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मनोहर गणपत सपाटे व ज्ञानेश्वर बबन सपाटे यांना यापूर्वी नोटीस देऊनही त्यांनी संबंधित परवानगी न घेता बांधकाम पूर्ण केले असल्याने त्यांच्या विरोधात प्राचीन स्मारके व पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम, 1958 चे कलम 30 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संरक्षित स्मारकांच्या परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande