बीएमसीच्या विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांच्याकडून विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक
* महसूल प्राप्तीसाठी उत्तम कामगिरी मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) - करनिर्धारण व संकलन, जल अभियंता आणि अनुज्ञापन खात्याच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या महसूल प्राप्तीच्या कामगिरीचा बृहन्मुंबई महानगरपालिका विधी समिती अध्यक्षा दिक्षा हर्षद कारकर यांन
बीएमसीच्या विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांच्याकडून विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक


* महसूल प्राप्तीसाठी उत्तम कामगिरी

मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) - करनिर्धारण व संकलन, जल अभियंता आणि अनुज्ञापन खात्याच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या महसूल प्राप्तीच्या कामगिरीचा बृहन्मुंबई महानगरपालिका विधी समिती अध्यक्षा दिक्षा हर्षद कारकर यांनी आज (दिनांक ०१ एप्रिल २०२६) विधी समिती दालनात आढावा घेतला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७ हजार ३४१ कोटी रुपये इतके उद्दिष्ट निश्चित केले होते. तथापि, करनिर्धारण व संकलन विभागाने त्यापेक्षा अधिक म्हणजेच ७ हजार ६१० कोटी ९० लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलित केले. तसेच, जल अभियंता आणि अनुज्ञापन खात्यानेही सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात देयके आणि महसुलाच्या बाबतीत उत्तम कामगिरी बजावली. याबद्दल या विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे श्रीमती कारकर यांनी यावेळी कौतुक केले. तसेच, भविष्यातही अशीच कामगिरी करित राहावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

यावेळी उप जल अभियंता (नियोजन व नियंत्रण) श्री. मंगेश शेवाळे, उप करनिर्धारक व संकलक श्री. अशोक मासाळ, अनुज्ञापन अधीक्षक श्री. अनिल काटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, करनिर्धारण व संकलन विभागाने संकलित केलेला मालमत्ता कर, जल अभियंता विभागाकडून संकलित जल देयक तसेच अनुज्ञापन विभागाने जाहिरात फलकांच्या माध्यमातून प्राप्त केलेला महसूल आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande